Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, भाच्याच्या रडण्यामुळे डोकं दुखत असल्यामुळे मामानेच भाच्याला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून ठार मारले

Webdunia
गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (20:36 IST)
धुळ्यात  भाच्याच्या रडण्यामुळे डोकं दुखत असल्यामुळे संतप्त झालेल्या मामानेच भाच्याला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून ठार मारलं आहे. पोलिसांनी  आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपी मामाने आपणच भाच्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
 
धुळे शहरातील फिरदोस नगर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भाच्याच्या रडण्याच्या त्रासाला कंटाळून मामाने भाच्याला ड्रम मध्ये बुडून ठार मारले आहे. शहरातील फिरदोस नगर येथे आजोळी हा भाचा आला होता. अवघ्या चार वर्षांच्या मोहम्मद हाजीक एजाज अहमद असं मयत मुलाचे नाव आहे. जोरजोरात रडण्याच्या कारणावरून संतापलेल्या नूरुल अहमद याने भाचा मोहम्मद हजिकला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपण मोहम्मद हाजीक एजाज अहमदला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारल्याची कबुली नूरुल अहमद याने दिली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
धुळ्यातील फिरदोस नगरमधील पीडित मुलाची आई माहेरी आली होती. त्यानंतर महिलेचा पती कामावर निघून गेला होता. महिलेचा लहान मुलगा हाजिक हुसैन व लहान भाऊ नुरूल अहमद नईम अहमद हे दोघे घरात खेळत होते. त्यावेळी आरोपी मामा आणि भाचा खेळत असताना मोहम्मद हाजी एजाज हुसैन रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे आरोपीला त्रास होऊ लागला. रागाच्या भरात त्याने लहानग्या भाच्याला पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बुडवले. अचानक मुलाचा आवाज बंद झाल्यामुळे त्याची आई काय झालं पाहायला गेली. महिलेला प्लास्टिक ड्रममध्ये मुलगा खाली डोकं वरती पाय अशा अवस्थेत आढळला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments