Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेततळ्यात बुडून सक्ख्या भाऊ बहिणीचा दुर्देवी अंत

The unfortunate end of Sakya brothers and sisters drowning in the fieldशेततळ्यात बुडून सक्ख्या भाऊ बहिणीचा दुर्देवी अंत  Marathi Regional News In Webdunia Marathi
, मंगळवार, 18 जानेवारी 2022 (13:04 IST)
पाटणच्या रोमनवाडी -येराड येथील एका फार्महाऊसजवळ असलेल्या शेततळ्यात बुडून भाऊ आणि बहिणीचा दुर्देवी अंत झाला. सौरभ अनिल पवार(16) आणि पायल अनिल पवार(14) असे या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे रोमनवाडी -येराड येथे एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वर सचिन जाधव कामासाठी आहे. सोमवारी सचिन यांच्याकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार आपल्या कुटुंबाला घेऊन भेटावयास आले होते. ते कामानिमित्त विजयनगर येथे वास्तव्यास आहे. मुलगा सौरभ हा आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर मुलगी पायल ही इयत्ता आठवीत होती. पवार कुटुंब  सचिन जाधव यांच्याकडे भेटायला आले होते.  सौरभ आणि पायल हे फार्महाउस पाहण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्या मुलांवर झडप घातली आणि सौरभचा पाय घसरून तो फार्महाउस जवळच्या शेततळ्यात पडला. आणि बुडू लागला . आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहीण पायल  ही देखील पाण्यात बुडू लागली आणि क्षणातच हे दोघे भाऊ बहीण शेततळ्याच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळतातच सचिन जाधव आणि मुलांचे आईवडील शेततळ्याजवळ पोहोचले तो पर्यंत ते दोघे बुडाले होते.  ही  दुर्देवी घटना सोमवारी  सांयकाळी घडली . घटनेची माहिती मिळतातच पोलिसांसह गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव  घेतली . त्यांचे मृतदेह रात्री उशिरा  मच्छीमार करणाऱ्या मुलांच्या मदतीने काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले . मुलांचे मृतदेह पाहता आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे .
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बळी देताना बकऱ्याऐवजी कापला माणसाचा गळा