Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगरकराना एकसष्टीची वैष्णवदेवी सहल चांगलीच भोवली ! तब्बल दीडशे करोना बाधित..!

The Vaishnav Devi trip
, बुधवार, 24 मार्च 2021 (11:32 IST)
अहमदनगर शहरातील एका प्रथितयश हॉटेल व्यावसायिकाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त वैष्णवदेवीला रेल्वेतून काढण्यात आलेली सहल अनेकांना भोवली आहे. सहलीहून परतल्यानंतर दीडशेहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. करोनाचे रुग्ण वाढण्यामागे बाहेरगावाहून आलेले आणि बाहेरगावी प्रवास करून आलेल्यांची संख्या मोठी असल्याचे प्रशासन वारंवार सांगत आहे.
 
नगर शहरात नगर-मनमाड महामार्गावर शहरापासून जवळच हॉटेल चालविणाऱ्या आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या या व्यावसायिकाचा ६१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त नातेवाईक, मित्र आणि समाजातील काही जवळच्या वक्तींची वैष्णवदेवी, जम्मू, काश्मीर, पंजाबमधील अमृतसर या भागातील विविध धार्मिक ठिकाणी भेटी देण्यासाठी सहल काढण्यात आली.
 
१४ मार्चला वाढदिवस होता. त्यासाठी १० ते १८ मार्च अशी सहल काढण्यात आली. यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, शेवगाव या ठिकाणांहून १८५ जण सहभागी झाले. प्रवासाला निघण्यापूर्वी सर्वांची कोविड चाचणी करून घेण्यात आली. तर संसर्ग नसलेल्यांनाच सहलीला नेण्यात आले. सर्वजण नगरहून रेल्वेने गेले होते. सहलीवरुन परतल्यावर अनेकाना त्रास जाणवु लागला असुन त्यातील १५० वर जणाना कोरोना झाला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापुरातील रस्त्यावर I Love You !