Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नीने पतीला जिवंत जाळून निर्घृण हत्या केली

Webdunia
बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (14:55 IST)
भांडण प्रत्येक जोडप्यात होतात.पण एखाद्याने विकोपाला जाऊन असे काही करावे हे धक्कादायकच आहे.रागाच्या भरात येऊन एका महिलेने आपल्या पतीची पेट्रोल घालून त्याला पेटवून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगळुरू येथे घडली आहे. इतकेच नाही तर पेटवून आपल्या पतीच्या डोक्यात दगड देखील घातला.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.कर्नाटकातील तुमकूर या भागाची ही घटना आहे.
 
याचे कारणं असे की या जोडप्याचे लग्न होऊन 8 वर्ष झाले होते.या जोडप्याला तीन मुली असल्याचे समजले आहे.या जोडप्याचे  सततचे भांडण होत असे.कारण त्यामहिलेचे आपल्या शेजाऱ्याशी अनेतिक संबंध होते.पुन्हा भांडण झाल्यावर पत्नीला पतीचा राग आला आणि तिचा हा राग अनावर झाला.शेवटी तिने रागाच्या भरात येऊन आपल्या पतीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि त्याला पेटवले.पतीनं आपले जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण पत्नीने त्याला नाल्यात ढकलून दिले आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नंतर तिने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा केल्याची कबुली दिली.मी आपल्या पतीच्या छळाला कंटाळून असे केल्याचे तिने सांगितले.आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments