Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोल्हापूर-कळे रस्त्याचे काम एप्रिलपर्यंत होणार पूर्ण काम गतीने सुरु

road
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (07:38 IST)
कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुपरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. या रस्त्यासाठी खासगी मालकीची सुमारे 4 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. महसूलसह अन्य संबंधित विभागाकडून ही प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होण्यासाठी आणखी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पार पडल्यास एप्रिल 2024 पर्यंत रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रोजेक्ट मॅनेजर अविनाश मरजीवे यांनी दिली.
 
जालना येथील व्ही.पी.सेट्टी कंपनीकडून हे काम सुरू आहे. दुपरीकरण करताना सध्याच्या रस्त्यामध्ये कळंबा, भामटेसह अन्य गावांनजीक असणारी वळणे काढली जाणार आहेत. अशा ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच बालिंगा येथे होणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करताना एका बाजूस शासकीय जमीन असली तरी दुसऱ्या बाजूस खासगी जमीन आहे. या जमिनीचे तत्काळ भूसंपादन होणे आवश्यक आहे. हा रस्ता 16 मीटरचा होणार असल्यामुळे फुलेवाडी ते बालींगा दरम्यान अनेक ठिकाणची बांधकामे काढावी लागणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार असून त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे कंपनीकडून प्रथम मरळी येथून रस्ते कामास सुऊवात केली आहे. दुपरीकरणाच्या या कामामध्ये कोठेही उ•ाण पूल होणार नाही. या रस्त्यावरील चढ-उतार काढले जाणार असल्यामुळे ज्या ठिकाण पूर्वीचा रस्ता सखल आहे, तेथे थोडा भराव टाकून रस्त्याची समान उंची केली जात आहे. त्यामुळे मरळी पुलाच्या पुर्वेकडील सखल भागात रस्त्याची उंची थोडी वाढवली आहे.
 
गावहद्दीत 1 मीटरचे काँक्रीट गटर
गावहद्दीतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गावाशेजारी 1 मीटर ऊंदीचे काँक्रीट गटर्स बांधले जाणार आहे. यामध्ये कळे गावहद्दीत 1 किलोमीटरचे मरळी 550 मीटर, भामटे 700 मीटर, कोपार्डे 500 मीटर, बालिंगा 550 मीटर तर फुलेवाडी हद्दीत 1540 मीटरचे गटर बांधले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्राहकांना दिलासा! सोने आणि चांदीच्या किमतीत झाली पुन्हा घसरण ; पहा काय आहे प्रति ग्रॅमचा भाव