मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणी सुरु आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. मात्र राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. या विरोधाचं कारण म्हणजे, उत्तर भारतात काँग्रेसला फटका बसू शकतो. मात्र, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “काँग्रेसने ताठर भूमिका घेऊ नये. काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको?”
याआधी अजित पवार यांनी याआधीही राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात अजित पवारांनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती.