Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा होणार

Webdunia
शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (09:40 IST)
शिवसेनेत दोन उभे गट पडल्याने कालच्या दसरा मेळाव्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेली लढाई उद्या निवडणूक आयोगामध्ये रंगणार आहे. असे असताना राज्यात आणखी एका कारणासाठी शिंदे-ठाकरे नावे चर्चेत आली आहेत.
 
ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा होणार आहे. खूप लांब नाही, येत्या ८ तारखेचाच मुहूर्त आहे. महत्वाचे म्हणजे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी गटतट विसरून या लग्नाला हजेरी लावणार आहेत. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.
 
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हे लग्न आहे. या पत्रिकेने पुण्याचेच नाही तर राज्याचे लक्ष वेधले आहे. एकीकडे राजकारणात शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असताना या शिंदे आणि ठाकरे कुटुंबात दिलजमाईचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. ही पत्रिका पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत.
 
वडगावसहाणी गावातील शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांचा मुलगा विशाल आणि  आंबेगाव तालुक्यातील साल गावची कन्या  अनुराधा ठाकरे यांचा विवाह येत्या ८ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेतील वर्चस्वावरून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकाच घरातील व्यक्ती या दोन गटांत विखुरले गेले आहेत. परंतू, लग्नसोहळा असल्याने ठाकरे, शिंदे गट विसरून शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक या लग्नाला आवर्जून जाणार आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अ‍ॅसिडिटी आहे असे समजून महिनाभर गोळ्या घेतल्या, मुंबईतील महिलेच्या पोटात फुटबॉलपेक्षा मोठी गाठ आढळली

'बाळासाहेबांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले असते तर आज...',उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव गटावर निशाणा साधला

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का, 13 'आप' नगरसेवकांनी दिले राजीनामे

बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

चप्पलमध्ये लपवून सोने तस्करी करणाऱ्या नागरिकाला डीआरआय ने मुंबईत ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments