Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

म्हणून बस अपघाताच्या ठिकाणी उदक शांती संपन्न

, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (21:18 IST)
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील मिरची चौकात खाजगी बसचा झालेला भीषण अपघात झाला होता. यात १२ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता. दरम्यान  याच  बस अपघाताच्या ठिकाणी नाशिक मधील साधू, महंतांकडून उदक शांती विधी करण्यात आला आहे.
 
नाशिक शहरातील औरंगाबाद नाक्यावरील मिरची हॉटेल जवळ आज नाशिक जिल्ह्यातील सर्व साधू महंत पंडित, यांनी एकत्रित येत दुर्घटनेत मृत झालेल्या आत्म्यांना शांती मिळावी तसेच त्या जागेवर पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून ‘उदक शांती ” विधी करण्यात आला आहे. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी या उदक शांती विधीचे आयोजन केले होते. उदक शांती हा विधी कात्यायन सूत्राच्या आधारीत नियमाद्वारे करण्यात आला आहे. तसेच यावेळी सर्व धर्माचे धर्म गुरू हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पंजाबी, जैन तसेच किन्नर समाजाचे प्रतिनिधी देखील या विश्व शांती प्रार्थनेसाठी आणि श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते अशी प्रतिक्रिया या उदक शांती विधीचे आयोजक महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी दिली आहे.
 
अपघाताच्या ठिकाणी नाशिकच्या साधू महंतांकडून विश्वप्रार्थना करण्यात आलीये. नाशिक जिल्ह्यातील सर्व साधू, महंत धर्मगुरूंनी एकत्रित येत ही विश्व प्रार्थना केली. ज्या जागेवर हा अपघात झाला त्या जागेवर होम हवन करत मृत आत्म्यांना शांती मिळावी म्हणून पुजा पाठ केला. महंत अनिकेत शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अपघात ग्रस्त स्थळावर विश्वशांती दरम्यान सर्वधर्मीय धर्मगुरू उपस्थित होते अशी माहिती देण्यात आली.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स टाॅइजची विक्री करण्याचा प्रकार लष्कर पोलिसांनी आणला