Festival Posters

त्यांचं डोक्याचं संतुलन बिघडलं आहे, त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे शॉक दिले पाहिजे

Webdunia
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (22:18 IST)
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर पुन्हा एकदा गंभीर टीका केली आहे.गुलाबराव पाटील म्हणाले, ”यात्रा काढणं हा त्यांचा अधिकार होता, यात्रा काढण्याबद्दल कुणाचंही दुमत नव्हतं. यापूर्वी देखील प्रत्येक पक्षाने आपल्या परीने यात्रा काढलेल्या आहेत. पण त्यांनी जे वक्तव्यं केलं होतं की ते कोणत्याही लोकशाहीमध्ये झालेल्या घटनेत सगळ्यात वाईट घटना त्यांनी त्या दिवशी केली. यापूर्वी जर आपण यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतर आदर्श नेत्यांची नावं आपण पाहिली, तर कोणत्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं. अशाप्रकारचं वक्तव्यं नारायण राणे सारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलं. मला तर असं वाटतं की… मी कालही बोललो आणि आजही सांगतोय, त्यांचं डोक्याचं संतुलन बिघडलं आहे. त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे शॉक दिले पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांची तपासणी करून, त्यांना पक्षाच्या कामासाठी आजची जी रथयात्रा जी सुरू झाली आहे, त्या यात्रेला थांबवून पुन्हा ती सुरू करण्यासाठी मला तरी वाटतं की, त्यांची चाचणी व्हावी. आज त्यांना अटक झाली हे चागंलं काम झालं. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा जर असेल, तरी तो मुख्यमंत्री हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो १२ कोटी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्या पदाचा मान राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने केलेली कारवाई योग्य आहे, असं मला वाटतं.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

मानवभक्षी बिबट्यांची नसबंदी केली जाणार; महाराष्ट्र राज्याचा मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवडमध्ये निवृत्त महिला प्राध्यापक आणि वृद्ध जोडप्याला डिजिटल अटक करून लुटले

LIVE: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद

येवल्यात शिवसेना यूबीटीला मोठा धक्का, संभाजी आणि मारुती पवार राष्ट्रवादीत सामील

आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांना मोठे यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments