Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी कपात

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (21:46 IST)
मुंबईतील रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने येत्या मंगळवार आणि बुधवारी मुंबईत काही ठिकाणी पाणी कपात केली जाणार आहे. मंगळवार ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून बुधवार १० फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण भागात कमी दाबाने पाणी येईल. पाण्याची समस्या लक्षात घेता नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
येत्या ९ आणि १० फेब्रुवारीला महापालिकेच्या ‘एफ/उत्तर’ विभागातील रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे ९०० मिमी जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहे. १० फेब्रुवारीला रात्री १० वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 
या भागात पाणी पुरवठा पूर्ण बंद असणार
दादर, माटुंगा, चुनाभट्टी, किंग सर्कल, सायन, अँटॉप हिल
या भागात कमी दाबाने येणार पाणी
दादर, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ VBA आंदोलन, 25 कामगार अडकले

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांना अपशब्द वापरले

'राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा', परदेशात केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले भडकले

भिवंडीत गणपती विसर्जनाच्या दगडफेक यामुळे दोन गटात हाणामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

पुढील लेख
Show comments