Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

हे सगळ्यांचं पोट भरणारं खातं आहे, भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

हे सगळ्यांचं पोट भरणारं खातं आहे, भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
, शुक्रवार, 14 जुलै 2023 (21:29 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रीमंडळात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं मिळालं आहे. यानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 
 
छगन भुजबळ म्हणाले, “कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना ५४ हजार दुकानांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पुरवलं. सगळं बंद होतं, केवळ रेशन दुकानं आणि रुग्णालयं चालू होती. पोलीस, डॉक्टर आणि रेशन पुरवणारे सगळे कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. अनेक अडचणी येऊनही कुठे अन्नधान्य पोहचलं नाही, असं झालं नाही.”
 
“ठीक आहे, हे खातं चांगलं आहे. आपण गोरगरिबांसाठी शिवभोजनसारख्या योजना सुरू केल्या. तांदूळ मोफत आणि दुप्पट द्यायला लागलो. आताही दिवाळीला गोरगरिबांना गोडधोड करता यावं म्हणून अनेक योजना आखता येतील. मला आनंद आहे की, हे सगळ्यांचं पोट भरणारं खातं आहे. शेतीत जे अन्नधान्य तयार होतं ते घराघरात पोहचवण्यासाठी या खात्याचा उपयोग होतो याचा मला आनंद आहे,” अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
 
 
अर्थखातं अजित पवारांकडे कृषी खातं सत्तारांकडून धनंजय मुंडेंकडे गेल्याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “अर्थखातं अजित पवारांकडे आहे ही चांगली गोष्ट आहे. अजित पवारांनीही आम्ही सर्वांना न्याय देणार असं सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्यावर ते कुठल्याही एका घटकाचे नसतात, ते सगळ्या राज्याचे, सर्व लोकांचे आणि सर्व पक्षांचे असतात. ते त्यात भेदभाव करणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य मिळेल.”

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs WI : रोहित-यशस्वी जोडीने मोडला 21 वर्षांचा विक्रम, गावस्कर आणि सेहवागला मागे टाकले