Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी अशी आहे तयारी

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (20:52 IST)
कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी रविवारी (१ जानेवारी) होणारी गर्दी विचारात घेऊन पुणे पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐतिहासिक स्तंभ सोहळ्यासाठी येणाऱ्या पुण्यासह राज्यातील ७० कार्यकर्त्यांना कोरेगाव भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटीस बजाविण्यात आली आहे.  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे ग्रामीण, पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. 
 
गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे तसेच राज्यातील ७० जणांना कलम १४४ नुसार कोरेगाव भीमा परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
 
ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी समाजमाध्यमावरील मजकुरांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या चौघांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयानांनी पोलिसांना सहकार्य करुन कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तात राहणार आहेत. अभिवादन सोहळ्यात हाेणारी गर्दी विचारात घेऊन पेरणे फाटा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सोहळ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'वरात' म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवारांची टीका

LIVE: 'आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...', सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'बारात' म्हणणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांचा सल्ला

महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात तोतया जवानाला अटक

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

पुढील लेख
Show comments