काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. मुंबई येथे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुनगंटीवार पुढे म्हनाले की. योग्य वेळ आली की, भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. राज्यपालांनी आम्हालाही सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचाच कालावधी दिला. सर्वात मोठा पक्ष भाजप असताना आणि मतदारांनी तसा जनादेश दिलेला असताना मित्र पक्षाने जनादेशाचा अनादर केला. इतर पर्याय असल्याचं सांगून मित्रपक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती ओढवली. काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.