सोमवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईच्या ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची सूचना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन उत्तरप्रदेशातून आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मुंबईच्या ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. आणि त्याने फोन कट केला. पोलिसांनी तातडीनं जागेचा शोध घेतल्यावर त्यांना काहीच आढळले नाही. पोलीस कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन उत्तरप्रदेशातून आला असून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवली असून कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.