Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस सावधानतेचा इशारा

Three days warning to Kolhapur district Maharashtra News Regional Marathi News in Marathi Webdunia Marathi
, बुधवार, 21 जुलै 2021 (08:25 IST)
वेधशाळेच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्याला आज बुधवार पासून नागरिकांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान वेधशाळेने २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २१ व २२ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ व२३ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिलेला आहे.
 
या कालावधीमध्ये अति पाऊसमान( प्रतिदिन ७० ते १५० मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. विशेषत: जिल्हयातील चंदगड,आजरा,राधानगरी,शाहूवाडी,पन्हाळा,गगनबावडा,भुदरगड या तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अंदाजित पाऊसमानानुसार नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे,या सारख्या घटना संभावत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने  केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईलाऑरेंजअर्लट,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस