Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू

Three friends died on the spot in the accident अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यूMarathi Regional News  In Webdunia Marathi
, रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:02 IST)
अहमदनगर श्री गौंदा येथे राहणाऱ्या मित्राला सोडण्यासाठी निघालेल्या मित्रांचा उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राहुल आळेकर, केशव सायकर, आणि आकाश खेतमाळीस असे या मयत झालेल्या मित्रांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि आकाश हे दोघे केशव ला सोडण्यासाठी कारने काष्टीला निघाले असता हॉटेल अनन्या जवळ हा अपघात झाला. 
 
श्री गौंदा ते दौंड रास्ता सिमेंट काँक्रीट असल्याने वाहनांचा वेग जास्त आहे. या टाळक्यात साखर कारखाना असल्यामुळे सध्या गळीत हंगाम सुरु असल्याने वाहनांची वाहतूक सुरूच असते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टेर नसल्याने अपघात जास्त होत आहे. यांची कार ऊसाच्या ट्रेलर ला मागून धडकली धडक एवढी जोरदार होती की तिघांचा जागीत मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात आज 4,359 कोरोना रुग्णांची नोंद, 237 ओमायक्रॉन बाधित आढळले