Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रकची धडक दुचाकीला लागून भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू

Three members of the same family died in a tragic accident when a truck hit a two-wheeler ट्रकची धडक दुचाकीला लागून भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू
, शुक्रवार, 6 मे 2022 (11:11 IST)
अर्जुनी तालुक्यातील नैनापूर गावाजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवर मेश्राम पती पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे देवरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गा सहा वरून प्रवास करत असताना नैनापूर गावाजवळ भरधाव येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. चिन्मय तुळशीराम मेश्राम(6),प्रीती तुळशीराम मेश्राम(34),आणि एका 12 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला तर तुळशीराम रामा मेश्राम(45) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.  
 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाजारात हापूस आंब्यांची आवक वाढल्याने हापूस आंब्याचे दर घसरले