Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाळीसगाव मध्ये शेतात कामगारांवर वीज कोसळली, ३ जणांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

lightning
, मंगळवार, 17 जून 2025 (14:19 IST)
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तहसीलदार म्हणाले, "चाळीसगावजवळील तुंगनगर गावात रविवारी दुपारी २ वाजता शेतात काम करणाऱ्यांवर वीज कोसळली. या घटनेत सुमारे पाच जण जखमी झाले. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. परंतु त्यापैकी तिघांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
तहसीलदारांनी सांगितले की, मृतांची ओळख दशरथ पवार, लखन पवार, समाधान राठोड अशी आहे. प्रशासनाने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
तसेच  राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका अहवालात म्हटले आहे की १ जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की हे मृत्यू रस्ते अपघात, पुलावरून पडणे, बुडणे, वीज पडणे आणि मुसळधार पावसामुळे आग लागणे अशा विविध घटनांशी संबंधित आहे.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: बॉम्बच्या धमकीनंतर इंडिगो विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग