Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक ग्रामीण,धुळे,जळगाव,नंदूरबार अन् अहमदनगरमधील 16 पोलिस उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Transfer of 16 Sub-Inspectors of Police in Nashik Rural
, बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:29 IST)
नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील पोलिस उपनिरीक्षकांच्या नाशिक परिक्षेत्र अंतर्गत आज बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर,जळगाव,नंदूरबार,नाशिक ग्रामीण,धुळे या जिल्ह्यातील 16 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी  काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे.
 
बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे
1. माधव पुंडलिक केदार (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
2. सुरज पांडुरंग मेढे (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
3. रावसाहेब काशिनाथ त्रिभुवन (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
4. प्रकाश रामनाथ गवळी (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
5. दिलीप आनंदराव बोडके (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
6. चंद्रभान सखाराम जाधव (धुळे ते नाशिक ग्रामीण)
7. कैलास शंकर कपिले (धुळे ते नाशिक ग्रामीण)
8. समाधान रामकृष्ण गायकवाड (धुळे ते जळगाव)
9. भाईदास मुलसिंग मालचे (जळगाव ते धुळे)
10. विजय सोनु गायकवाड (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
11. नासिरखान कलमशेरखा पठाण (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण)
12. सुरेश बाबुलाल चौधरी (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण)
13. अभय चिंतामण मोरे (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण)
14. उत्तम खंडु शिंदे (नंदुरबार ते नाशिक ग्रामीण)
15. कृष्णा वासूदेव पाटील (नाशिक ग्रामीण ते धुळे)
16. नाना दौलत आहिरे (नाशिक ग्रामीण ते जळगाव)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुणाचा गेम वाजवण्यासाठी पिस्तूल खरेदी करायची म्हणून त्याने एटीएम फोडले