Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेकिंग करण पडलं महागात, डोंगरावरुन कोसळून दोघांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (21:21 IST)
नाशिकमधील चांदवड तालुक्यातील हबडीच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना तीन ट्रेकर्स डोंगरावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन तरुण ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रॅपलिंग करताना डोंगरावरुन तिघे कोसळल्याची घटना घडली. अहमदनगर येथून 8 मुली व 7 मुले असे एकूण 15 जण ट्रेकिंग करण्यासाठी या शेंडीच्या डोंगरावर आले होते. अनिल वाघ आणि मयुर मस्के अशी मयतांची नावे आहेत तर प्रशांत पवार असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाकी ट्रेकर्स सुखरूप आहे. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी अन्य 12 ट्रेकर्सची सुखरुप सुटका केली आहे
 
हबडीची शेंडी येथे आरोहण मोहिमेत सहभागी होण्यासाठी हे सर्वजण आले होते. सर्व ट्रेकर्स अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. अहमदनगरमधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने या आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 8 मुली व 7 मुलगे सहभागी झाले होते. आरोहण मोहिम झाल्यानंतर सर्व  ट्रेकर्सला खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटी अनिल वाघ, मयुर मस्के आणि प्रशांत पवार हे तिघे जण खाली उतरत असताना खाली कोसळले. यापैकी अनिल वाघ आणि मयुर मस्के हे दोघे ठार झाले तर प्रशांत पवार जखमी झाला. जखमी प्रशांत पवारला मनमाड येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कातरवाडी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

US-China व्यापार करारानंतर भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, प्रमुख शहरांमध्ये नवीनतम दर काय आहे?

३ दिवसांत ६ घरांचे चुले विझले, चंद्रपूरच्या जंगलात वाघीणचा दरारा

ट्रम्प हे कुटुंबाचे देवता आहेत! संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, मोदी-शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

LIVE: बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची नव्याने चौकशी होणार

Badlapur Case: बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची नव्याने चौकशी होणार, डीजीपी रश्मी शुक्ला यांनी नवीन एसआयटी टीम स्थापन केली

पुढील लेख
Show comments