Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारू पिऊन नवरा द्यायचा त्रास ! अहमदनगर जिल्ह्यातील महिलेने जे केले ते वाचून बसेल धक्का !

Trouble giving
, शनिवार, 26 जून 2021 (07:57 IST)
अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे नवरा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता.त्यामुळे पत्नी त्रस्त झाली होती. तिने आधी याबाबत अनेकवेळा पतीला समजावून सांगितले होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता.
 
त्यामुळे भावाच्या मदतीने पत्नीनेच पतीला विजेच्या शॉक देऊन व दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी जयश्री संवत्सरकर व तिचा भाऊ किरण ढोणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केलीय.6 जून रोजी रात्रीच्या सुमारास पतीला आधी केबलच्या सहाय्याने विजेच्या शॉक दिला. शॉक ने काही अंशी मृर्च्छित झाल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास दिला.
 
शहर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दारूच्या नशेत मयताने विजेच्या शॉक घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.मात्र पोलीस तपासात व मयताच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आली होती त्या वरून तपासी अधिकार्‍यांनी तपास केला असता ही खुनाची बाब उघड झाली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांनी अहवालात मयताचा मृत्यू हा गळा आवळून झाला असल्याचा अभिप्राय दिला होता. याबाबत पोलिसांनी या बाबी निष्पन्न झाल्याने आरोपीना बेड्या ठोकल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक सूचना निर्गमित