Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

Trying to bring pressure from BJP in any way possible to get power - Jayant Patil सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न - जयंत पाटीलMaharashtra News Regional Marathi News  In Webdunia Marathi
, रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (11:07 IST)
भाजपला सत्तेत येण्याची घाई झालेली असल्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सगळ्या मार्गाचा अवलंब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला.
 
छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच अनिल देशमुखही निर्दोष सुटतील. त्यांनी काहीही केलेलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र नेत्यांचा मानसिक छळ आणि सरकारला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचंही पाटील म्हणाले.
 
समीर वानखेडे प्रकरणाबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, कारवाईत मराठी-अमराठी मुद्दा नसतो. भुजबळ यांना ईडीनं 28 महिने तुरुंगात ठेवलं, तेही मराठीच होते. त्यामुळं नियमानुसारच सर्वकाही होणार.
जयंत पाटील सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
 
जिल्हा परिषदेत आघाडीवर राष्ट्रवादीचा जोर असून मविआमधील तिन्ही पक्ष सामंजस्याने काम करतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्देवी : दिवाळीपूर्वीच घरात अंधार झाला, घरावर लाइटिंग करताना शॉक लागून पतीचा मृत्यू