Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत, दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी

tukaram mundhe
, गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:04 IST)
नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावर असणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे. 
 
तुकाराम मुंढे यांची बदली सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंच्या कामकाजावर नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्यया भाजपने तसंच काँग्रेसनेही नाराजी दर्शवली होती. नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या