Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Death
, शनिवार, 17 मे 2025 (20:57 IST)
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मध्ये  बैलांना आंघोळ घालताना तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी नांदगाव तांडा येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तिसऱ्या मुलाचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितनुसार  शनिवारी हे तिघेही बैल धुण्यासाठी नांदगाव तांडा जलाशयावर गेले असता, पाण्याची खोली माहित नसल्यामुळे ते बुडाले. जलाशयावर कपडे धुणाऱ्या महिलांना हे लक्षात येताच त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण एकालाच वाचवण्यात यश आले. 
तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून इतरदोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. संध्याकाळी उशिरा महसूल पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेची चौकशी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: ओव्हरलोडेड भाजप लवकरच बुडेल-उद्धव ठाकरे