Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवळाली कॅम्प परिसरात दोन बिबटे जेरबंद

Webdunia
मंगळवार, 31 जानेवारी 2023 (15:16 IST)
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरात बनात चाळ व वडनेर दुमाला परिसरात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. येथील बनात चाळ परिसरातील नाल्यामध्ये लावलेल्या पिंजर्‍यात एक बिबट्या जेरबंद झाला असून त्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पिंजर्‍यासह बिबटया ताब्यात घेत नाशिकला गंगापूर रोपवाटिकेत ठेवण्यात असल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली.
 
देवळाली कॅम्प परीसर घनदाट झाडीनी वेढला असून बिबट्याचा वावर वाढला आहे येथील रेस्ट कॅम्प रोडवरील बनात चाळ पगारे चाळ जवळील नाल्यात वणविभागने लावलेल्या पिंजर्‍यात सोमावरी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी वैशाली मुकणे यांनी भेट दिली.
 
बिबटया जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनाधिकारी प्रविण गोलाईत, वनरक्षक दर्शन देवरे, विशाल शेळके, विजय साळुंखे, वाहन चालक शरद अस्वले यांनी घटनास्थळी भेट देत पिंजरा ताब्यात घेतला.याच परिसरात आणखीही काही बिबटे आहे त्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी संतोष पगारे, विक्की हिरे, विजय बैद, सुजित जाधव, सुयोग तपासे, अविनाश घेगडमलसह महिला वर्गाने केली आहे.
 
वडनेर दुमालातही बिबट्या जेरबंद
आज पहाटे वडनेर दुमाला येथील रेंज रोड वरील बाजीराव पूजा पोरजे यांच्या मळ्यात एक बिबट्या जेरबंद झाला असून पिंजर्‍यसह बिबटया वनरक्षक गोविंद पंढरे वनमजूर निवृत्ती कोरडे वाहनचाल अशोक खानझोडे रेस्क्यू टीम नाशिक सुरक्षित घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात गणेशोत्सवात डीजे आणि संगीत प्रणालीवर बंदी घालण्याची मागणी

पुढच्या वर्षी AI डिजिटल कामांमध्ये मानवापेक्षा सरस ठरेल का? मस्क यांनी वर्तवला अंदाज

पुणेकरांची वाहन ओळख बदलणार! MH-12 ची जागा आता MH-61 घेणार

एथरने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली; २०० किमीची रेंज आणि मेटल बॉडी, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

५० रुपये रोजंदारी ते Fortuner! सफाई कर्मचारी सेसप्पांची संघर्षमय कहाणी व्हायरल

पुढील लेख
Show comments