Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उदय सामंत यांनी असे दिले ‘मविआ’च्या नेत्यांना प्रत्युत्तर

uday samant
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (21:22 IST)
टाटा एअरबर प्रकल्पाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘मविआ’च्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, “मिहानबरोबर एअरबसचा पाठपुरवा एमआयडीसीने केला होता, असे साधे अक्षरही उद्योग विभागाकडे नाही”, असा खुलासाही त्यांनी केला.  उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. 
 
“टाटा एअरबर प्रकल्पाबाबत तुमची बैठक अथवा व्यवहार कुठे झाला, याबाबत कागदपत्र सादर करण्याची विनंती केली होती. मात्र अजुनही काहीच कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाही. त्याउलट मीच आज काही कागदपत्र महाराष्ट्रासमोर सादर करणार आहे. ज्या ठिकाणी मिहान प्रकल्प होतोय त्याचठिकाणी पूर्वीपासूनच टाटाची एक कंपनी कार्यरत आहे. त्या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एअरबस प्रकल्पासाठी लागणारी जागा मिहानमध्ये मिळेल का?, अशी चौकशी त्यांनी केली होती. त्या अधिकाऱ्यांच्या या चौकशीनंतर महाराष्ट्र शासनामार्फत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, त्यासाठी प्रयत्नही करण्यात आलेले नाही”, असे उदय सामंत यांनी म्हटले.
 
“मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते असताना त्यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत त्यांनी सकारात्मक भुमिका घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कुठचा पुढाकार घेतला, किती बैठकी केल्या, मुख्यमंत्र्यांनी कधी बैठक घेतली, उद्योगमंत्र्यांनी काही बैठका घेतल्या का याबाबतची कागदपत्रे महाराष्ट्रासमोर सादर करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तसे झालेले नाही”, असेही सामंत यांनी म्हटले.
 
“एअरबसचा प्रकल्प नागपुरच्या मिहानमध्ये येणार असल्याचा कुठेही निर्णय झाला नव्हता. तसेच, एअरबसच्या बाबतीत एमआयडीसीसोबत कधीच बैठक झाली नव्हती. त्यावेळी ती चर्चा मिहान प्रकल्पाबाबत सुरू होती. ती बैठकीही स्थानिक अधिकाऱ्यांनी केली होती, सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याने केलेली नव्हती. त्यामुळे मिहानबरोबर एअरबसचा पाठपुरवा एमआयडीसीने केला होता, असे साधे अक्षरही उद्योग विभागाकडे नाही”,असा खुलासाही सामंत यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, खत प्रकल्पात १ दिवसाचा स्त्री अर्भक आढळले