छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीचा धोका टळला. संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी ते स्वत: बुधवारी सकाळी मुंबईला गेले. सातारकरांनी ‘गेट वेल सून’च्या प्रार्थना सुरू केल्या आहेत. दरम्यान, छत्रपती उदयनराजे भाेसले यांनी स्वतः ट्विट करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे.