Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली विधानसभा निवडणुकी बाबत उद्धव गटाने घेतला मोठा निर्णय

uddhav thackeray
, मंगळवार, 28 जानेवारी 2025 (17:15 IST)
दिल्ली विधानसभा निवडणूक जवळच येत आहे.सर्व पक्ष प्रचार करत आहे. पण सध्या इंडिया आघाडी मध्ये तेढ निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले कांग्रेस आणि आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुकीत एकटेच लढत आहे.  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर आघाडीतील पक्षांमधील अंतर वाढत चालले आहे.महाराष्ट्रात युती करुन निवडणुका लढवणारे कांग्रेस आणि शिवसेना यूबीटी वेगळे झाले आहे.  
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना यूबीटी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आप पक्षाचा प्रचार करणार नसून पक्षाने तटस्थ भूमिका घेतली आहे. असे खासदार संजय राउत यांनी सांगितले. 

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे दोन्ही पक्षांपैकी एकाचा प्रचार करणार का, असे विचारले असता ते म्हणाले, “आम्ही प्रचारासाठी कुठेही जात नाही आहोत. आम्ही तटस्थ आहोत.”
दिल्ली निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये 'आप'ला मोठा विजय मिळाला होता. चौथ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने आम आदमी पक्ष दिल्लीत दाखल झाला आहे. 

दिल्लीतील निवडणुकीच्या लढतीसाठी समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: ठाण्यात ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक