भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून नितीन गडकरी यांच्या समवेत अनेक बडे नेत्यांची नावे वगळली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकरींना भाजप सोडून महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.ही प्रतिक्रिया त्यांनी धाराशिव मध्ये एका सभेच्या वेळी बोलताना दिली.
ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना उद्देशून बोलताना दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा, तुम्ही महाविकास आघडीत या तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी आमची असं म्हणत खुली ऑफर दिली आहे.
आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे. भाजपची साथ सोडा, आणि महाविकास आघाडीतून उभे राहा,
महाराष्ट्राचं पाणी दाखवा. मी तुम्हाला महाविकास आघाडी कडून निवडून आणतो. ज्यावेळी नरेंद्र मोदींचे नाव कोणाला माहित नव्हतं त्यावेळी पासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यात भाजपच्या कित्येक पट पुढे गेलो होतो. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असे ठाकरे म्हणाले मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. पण या साठी जनतेने निवडून दिले पाहिजे.