Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे यांनी दिली नितीन गडकरींना महाविकास आघडीत येण्याची खुली ऑफर

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2024 (15:06 IST)
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून नितीन गडकरी यांच्या समवेत अनेक बडे नेत्यांची नावे वगळली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकरींना भाजप सोडून महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.ही प्रतिक्रिया त्यांनी धाराशिव मध्ये एका सभेच्या वेळी बोलताना दिली. 

ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना उद्देशून बोलताना दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा, तुम्ही महाविकास आघडीत या तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी आमची असं म्हणत खुली ऑफर दिली आहे. 
 आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे. भाजपची साथ सोडा, आणि महाविकास आघाडीतून उभे राहा,

महाराष्ट्राचं पाणी दाखवा. मी तुम्हाला महाविकास आघाडी कडून निवडून आणतो. ज्यावेळी नरेंद्र मोदींचे नाव कोणाला माहित नव्हतं त्यावेळी पासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यात भाजपच्या कित्येक पट पुढे गेलो होतो.  महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असे ठाकरे म्हणाले मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. पण या साठी जनतेने निवडून दिले पाहिजे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments