Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदची शपथ

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदची शपथ
, गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (18:52 IST)
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली.
 
शपथविधीनंतर शिवाजी पार्कवर आतषबाजी करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली होती. 
 
या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून लोकांच्या या आहेत 4 प्रमुख अपेक्षा