महाराष्ट्रातील नव्या सरकारनं आरे कारशेड प्रकल्पाला परवानगी दिलीय. यावरून आता वादाला सुरुवात झालीय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडवरून नव्या सरकारवर टीका केली होती.
यावर बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना बनवाबनवी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो.
सोमय्या पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी केवळ आरे कारशेडचं काम बंद पाडलं नाही, तर त्यामुळे बाकीची कामं देखील ठप्प झाली. दरम्यानच्या काळात मेट्रोचे डबे बनवणाऱ्या कंपन्यांनी करार रद्द केले. शिवाय, कर्ज वितरीत करणाऱ्या संस्थांनी देखील हात आखडता घेतला."
"येत्या सहा ते सात महिन्यात आरे कारशेड प्रकल्पाचं काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे वर्षभरात मुंबईत मेट्रो देखील धावायला सुरुवात होईल. परिणामी मुंबईल लोकलवरील बराचसा भार कमी होईल," असंही सोमय्या म्हणाले.