Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

ujjwal nikam
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (13:54 IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकार कडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.  या संदर्भात अधिकृत आदेश ही जारी करण्यात आला आहे.  देशमुख यांच्या कुटुंबांनी अशी मागणी केली होती.
ALSO READ: बदलापूर अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात पोलिसांना दिलासा, दंडाधिकाऱ्याच्या अहवालाला स्थगिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणात वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आणि अधिवक्ता बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या काही हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते.
 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. बीडमधील एका ऊर्जा कंपनीकडून खंडणी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे, तर कृष्णा आंधळे हा एक आरोपी अजूनही फरार आहे.  
या प्रकरणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोप केला आहे की इतर आरोपींची मदत करणारे लोक मोकाट फिरत आहे. कराड यांची बी टीम अद्याप बीड मध्ये सक्रिय आहे. आणि त्यांची  मदत करत आहे. 
वाल्मिकी कराड यांना आणखी एका खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात धनंजय देशमुख यांनी बालाजी तांडले, संजय केदार आणि वैबसे यांनी कराड आणि इतर आरोपींना मदत केल्याचा आरोप केला होता. ते  म्हणाले , 'माझ्या भावाच्या हत्येच्या आरोपींना जेव्हा जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा हे लोक तिथे उपस्थित असतात. ही कराडची 'बी टीम' आहे.
 
'पोलिस आणि तपास यंत्रणांना लेखी अर्ज दिले'
त्यांनी असाही दावा केला की हत्येनंतर हे तिघे 10-15 दिवस बेपत्ता होते आणि नंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्यांना सोडून देण्यात आले. ते म्हणाले, 'आम्ही कराडच्या बी टीमबद्दल पोलिसांना माहिती दिली होती आणि तपास यंत्रणांना लेखी अर्जही दिला होता. पण त्यानंतर काय झाले, आम्हाला माहित नाही. आम्हाला उत्तरे हवी आहेत.
Edited By - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बदलापूर अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात पोलिसांना दिलासा, दंडाधिकाऱ्याच्या अहवालाला स्थगिती