Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
, बुधवार, 28 जुलै 2021 (08:01 IST)
चिपळूणला पुन्हा उभं करण्यासाठी 5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने होणार नियुक्ती तर ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी  चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
 
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी जाहीर केले आहे.
 
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळदेखील गरजेचे आहे.ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधन सामग्रीसह पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, 11 वी प्रवेशासंदर्भात महत्वाची बातमी