Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुलडोझरचा वापर करीत उत्तर प्रदेश सरकारने ३५० बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर केली कारवाई

yogi adityanath
, सोमवार, 12 मे 2025 (10:54 IST)
उत्तर प्रदेश सरकारने ३५० बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. या सर्व कारवाई नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील भागात करण्यात आल्या आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही सरकारी किंवा खाजगी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.
ALSO READ: पुणे: कर्वेनगर परिसरात हमास समर्थक पोस्टर्समुळे गोंधळ, तरुणांना मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. यूपी सरकारने याबाबत एक निवेदनही जारी केले आहे. यामध्ये नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये सरकारी आणि खाजगी जमिनींवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांत शेकडो मदरसे, मशिदी, धार्मिक स्थळे आणि ईदगाह ओळखण्यात आले आहेआणि त्यांना सील करून पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही कारवाई मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. 
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर मध्ये लहान मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या २ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे: कर्वेनगर परिसरात हमास समर्थक पोस्टर्समुळे गोंधळ, तरुणांना मारहाण