Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेण्णालेक धरणाला भगदाड, जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न सुरु

Webdunia
साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे पाणी गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे. त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.
 
पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. 2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून  तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानशी मैत्री केल्याबद्दल तुर्कीला पश्चाताप होईल, जाणून घ्या देशाला उद्ध्वस्त करणारी ५ कारणे

मुलगी ऑर्केस्ट्राला गेली होती! संतप्त गावकऱ्यांनी आईला झाडाला बांधून बेदम मारहाण केली

Boycott Turkey मुंबई विमानतळावर तुर्की सेवा बंद होणार! शिवसेनेने गोंधळ घातला, बंद केल्यास काय परिणाम होईल?

कोण आहे विजय शाह? ज्यांच्याविरुद्ध कर्नल सोफियाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे FIR दाखल

२७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार, देशातील १४ राज्यांमध्ये वादळासह पावसाचा इशारा जारी

पुढील लेख
Show comments