Marathi Biodata Maker

पीडितांना प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज : फडणवीस

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (21:18 IST)
राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 
 
मराठवाड्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. 
 
शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात आजपासून बस, एसटी, टॅक्सी आणि ट्रकचा संप

युद्धाची तीव्रता भारतात पोहोचली, अमेरिकन पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी युद्धनौका बुडवल्याने ८० जणांचा मृत्यू

रंग लावायला गेलेल्या ४ वर्षाच्या मुलावर संतापलेल्या वृद्ध महिलेने उकळते पाणी ओतले; नागपूर मधील घटना

वर्ध्यात २३.२९ कोटी रुपयांच्या निधीतून भव्य वन इमारत बांधली जाणार; पालकमंत्री पंकज भोयर यांचे प्रयत्न

Rajya Sabha Elections शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस-यूबीटीचा पाठिंबा

पुढील लेख
Show comments