Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांचा जुगार खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोन हवालदार निलंबित

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (12:04 IST)
नागपूरच्या कळमना पोलीस चौकीत दोन पोलीस पोलीस ठाण्यात जुगार खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने सर्वत्र खळबळ उडाली. लोकांनी हा व्हिडीओ पाहून पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. 

व्हिडिओच्या आधारे दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहे. या दोघांपैकी एक कर्मचारी गणवेशात होता. आणि सिगारेट ओढत होता. 

लोकांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचवेळी आता दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. नागपूर पोलीस व्हिडिओच्या आधारे दोन्ही पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही जारी करण्यात आले आहे. या संदर्भात एका वृत्तसंस्थेला माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुना काँप्टी रोडवर असलेल्या कळमना पोलिस ठाण्यातील गैरव्यवहाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (झोन-5) च्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 
 
कळमना पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मी जुगार खेळत होते. या दरम्यान एक तक्रारदार ठाण्यात तक्रार करायला आला दोघे जुगार खेळण्यात व्यस्त असल्यामुळे त्याने त्यांचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूरसह राज्यातील इतर पोलीस ठाण्यांवर पोलीस विभाग नजर ठेवत असल्याचा दावा केला जात आहे. असे कृत्य करताना कोणी पोलीस आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

11 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढतील, NPPA ने सांगितले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम याच्याबाबत खुलासा

महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, आले अपडेट

Israel-Lebanon War : इस्रायलने उत्तर लेबनॉनमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले, 18 जणांचा मृत्यू

बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्यांना फाशी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुढील लेख
Show comments