मुंबईचा विकास आराखडा बिल्डरांना समोर ठेऊन तयार करण्यात आला असुन यामध्ये सुमारे १ लाख कोटीची जमिनीचे कैरात वाटण्यासाठी १० हजार कोटींचा भ्र्ष्टाचार झाल्याचा मांडवनीकार विरोधी पक्ष नेते म्हणून मागील चार वर्षात प्रसिद्धी मिळविलेल्या राधाकृष्ण विघे पाटीलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्भाग्यपुर्ण असुन ज्याप्रमाणे काँग्रेसचे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेवर एकही भ्र्ष्टाचाराचा वा नियमाविरुद्ध काम केल्याचा आरोप आम्ही करू शकत नाही तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्र्ष्टाचाराचा वा नियमाविरुद्ध काम केल्याचा आरोप करणे हा आरोप संपूर्णपणे हास्यस्पद असुन यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचेच नुकसान होणार जर राधाकृष्ण विघे पाटीलांनी जाहीर माफी मागीतली नाही तर त्यांना विदर्भाचे शेतकरी शेतमजुर व आदीवासी खुला विरोध करतील व त्यांच्या विदर्भ दौऱ्यात जाब विचारतील असा इशारा विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
सकाळी सरकारला शिव्या देऊन संध्याकाळी वर्षा बंगल्यावर हजेरी लावणाऱ्या राधाकृष्ण विघे पाटीलांनी आपल्या मागील चार वर्षात मांडवनीकार विरोधी पक्ष नेते काँग्रेसमधे नावलौकिक मिळवील्यामुळे त्यांना काँग्रेसने संघर्ष यात्रेत बाजुला सारले आहे. आपल्या सार्वजनिक जीवनात सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या शाळा कॉलेज साखर कारखाने व दारूचे कारखाने काडून सरकारी अनुदान व जनतेची लूट करून हजारो कोटीची संपत्ती जमा करणाऱ्या भ्र्ष्ट नेत्याने ज्या आमदाराने आपल्या १५ वर्षाच्या आमदारकीच्या काळात व मुख्यमंत्री झाल्यावरही एकही शाळा कॉलेज साखर कारखाने व दारूचे कारखाने काढले नाही एकही साधा कंत्राट घेतला नाही वा कुटूंबाच्या एकाही माणसाला सरकारी योजनेत भागीदारी घेण्यास मज्जाव केला साध्या राज्यमंत्रीचाही अनुभव नसतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भार भाजपने दिला त्यांनी चार वर्षात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी राजकीय अस्तिव नसलेल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन दररोज १८ तास काम करून विकासाचे व लोककल्याणकारी नवे पर्व सुरु केले ,आज अख्ख्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपला स्पष्ट येत्या निवडणुकीस मिळाल्यास आश्यर्य वाटू नये अशी परीस्थिती हे सत्य विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विघे पाटीलांनी जाणावे असा सल्ला किशोर तिवारी यांनी दिला आहे.