suvichar

मराठी रंगभूमीला सरकारचा दिलासा: विनोद तावडे

Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (10:07 IST)
मराठी नाटकांसाठी भाडयाने नाट्यगृह उपलब्ध करुन देताना त्या नाट्यगृहाचे भाडे रुपये १०००  आणि रुपये ५०० रुपयांच्या जुन्या चलनात स्वीकारण्याची परवानगी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
 
मराठी नाट्य़ व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व सचिव संतोष काणेकर यांनी आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठी नाटकांसाठी नाट्यगृहाचे बुकिंग करताना या नाटयगृहाटे भाडे जुन्या चलनात स्वीकारण्यात अनेक नाटयगृहांनी असमर्थता व्यक्त केली. यामुळे मराठी नाटकांना याचा फटका बसत होता. ज्याप्रमाणे महापालिका व नगरपालिकांना कर रक्कमेची देयके स्वीकारण्यासाठी जुन्या नोटांची सवलत दिली आहे, तश्याच प्रकारची सवलत नाटयनिर्मात्यांना दिल्यास मराठी नाटकांना दिलासा मिळू शकेल अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिस कार्यमंत्री तावडे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाट्यगृहांनी नाट्यनिर्मात्यांच्या नाटकाच्या भाड्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती देण्यात आल्याची माहिती श्री.विनोद तावडे यांनी दिली.
 
या निर्णयामुळे मराठी रंगभूमीला मोठा दिलासा मिळाला आहे. महानगर पालिका, नगरपालिका व जिल्हापरिषदच्या अंतर्गत असणा-या नाट्यगृहांची भाडे नाटय निर्मात्यांकडून स्वीकारण्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती पोटनिवडणूक: आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी; काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला

जपानी ऑलिम्पिक कुस्तीपटू सुगुमी सकुराईने वयाच्या २४ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला

CSK vs RCB:रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने चेन्नई सुपर किंग्सला ४३ धावांनी पराभूत केले

तेहरानमध्ये भीषण बॉम्बहल्ला; १३ जणांचा मृत्यू

LIVE: मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष

पुढील लेख
Show comments