suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपूर विठ्ठल मंदिरात VIP दर्शन पूर्णपणे बंद; सर्वसामान्य भाविकांना दिलासा

pandharpur
सध्या अधिक मास सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाविक  मोठ्या प्रमाणात पंढरपुरात गर्दी करत आहे. मंदिर प्रशासनानेया साठी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे भाविकांना विठ्ठल रखुमाईचे जलद व सुलभ दर्शन मिळणार आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीच्या माहितीनुसार, लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर ताण वाढला होता. त्यामुळे कोणालाही विशेष प्रवेश किंवा VIP पास दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले असून दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. 
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, “सर्वसामान्य भाविकांना विठ्ठलाचे सहज दर्शन व्हावे” हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
 
विनापरवाना भाविकांना थेट प्रवेश देणे आणि गैरप्रकार करणे अशा प्रकारावर मंदिर समितीने गांभीर्य घेत आधीच गुन्हे दाखल केले असून मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांची विभागीय चौकशी सुरु आहे. 
या निर्णयानंतर मंदिरातील नित्यपूजा आणि दर्शनावेळी पूर्वी VIP व्यक्तींना मिळणाऱ्या जागांवर आता सामान्य भाविकांना बसून विठ्ठल दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. वारकरी भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “वारी ही सर्वसामान्यांची” असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 
मंदिर प्रशासनाने दर्शन रांगांमध्ये शेडनेट, पावसापासून संरक्षण आणि स्प्रिंकलर यांसारख्या सुविधाही उपलब्ध केल्या आहेत. तसेच भाविकांनी वेळेचे पत्रक पाहूनच दर्शन रांगेत प्रवेश करण्याचे आवाहन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे. 
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून मनोरुग्ण तरुणा कडून मित्राची निर्घृण हत्या