suvichar

बाप्पांला निरोप देतांना राज्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2017 (11:32 IST)

गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देतांना विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे.  

औरंगाबाद : तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी ही लहान मुले गेली असताना ही दुर्घटना घडली आहे.  तर औरंगाबादमधील दौलताबाद तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला, आकाश साठे असे या मुलाचे नाव होते.  

पिंपरी-चिंचवड :  मुळा नदीत दोन मुले बुडाली

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाली आहेत. मुळा नदीत बुडालेली ही मुलं गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे.  मुळा नदीत बुडालेल्या सोनाजी धनाजी शेळके (वय १६) आणि रखमाजी सुदामराव वारकड (१७ ) अशी दोघांची नावे आहेत.  

पुणे :  2 तरुण तलावात बुडाले
पुण्यातील वडकी येथील  तलावात दोन मुले गणपती विसर्जन करतांना बुडाली. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावे आहेत.  

नाशिकमध्येही विसर्जनाला गालबोट  

नाशिकरोड चेहेडी पंपिग स्टेशन बंधारा येथे  विसर्जजनासाठी आलेला युवक भाविक किशोर कैलास सोनार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर  विसर्जनावेळी डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू, मुंगसरे गावाजवळ गणेश मराळेचा मृ्त्यू झाला. 

याशिवाय  बीडमध्ये  आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एकाचा तर जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे-बंगळूरू प्रवास ५ तासांनी कमी होणार! आधुनिक सुविधेसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

LIVE: ठाण्यात ९०० खाटांचे सुपर-स्पेशालिटी रुग्णालय मिळणार

पुणे विमानतळावरून तिरुपती, सोलापूर आणि मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरू होणार

तरुण पिढी 'झोम्बी ड्रग्स'च्या व्यसनाधीन होत आहे का? हा ट्रेंड किती धोकादायक आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घ्या

१०वीचा निकाल जाहीर झाला आहे, १२वीचा निकाल कधी लागणार, CBSE ने कोणती तारीख जाहीर केली आहे का?

पुढील लेख
Show comments