दर तीन वर्षातून येणार अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणी काळ असतो. त्यासाठी लाखो भाविकांनी पंढपुरात गर्दी केली आहे. तर अधिक महिना सुरु झाल्यापासून शहरात रोज दोन लाखापेक्षा जास्त भाविक येत आहेत. यातच शनिवार आणि रविवार या जोडून सुट्ट्या आल्यावर हा आकडा तीन ते चार लाखापर्यंत जात आहे.
पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढपुरात दाखल झाले आहेत. तसेच पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. दर तीन वर्षाने येणाऱ्या या पुरुषोत्तम मासाचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. दरम्यान शनिवार रोजी या महिन्याचा पर्वणी काळ आहे.
या अधिक मासातील या एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, कामिनी, ब्ल्यू डीजे, टटिस, शेवंती, गुलछडी, गुलाब अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा वगळून चौखांबी, सोळखांबी, विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडप येथे ही सजावट करण्यात आली आहे . या सुगंधी फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुगंधाने बहरुन गेले आहे.
पुरुषोत्तम मासातील ही पर्वणी गाठण्यासाठी पाच लाखापेक्षा जास्त भाविक सध्या पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. तर अजूनही हजारोंच्या संख्येने भाविक पंढपुरात दाखल होत आहेत. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची रांग ही थेट गोपाळपूर येथील तिसऱ्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. रिमझिम पावसातही भाविक दर्शन रांगेत उभे आहेत. चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांनी वाळवंटात गर्दी केली आहे.
मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट , प्रदक्षिणा मार्ग आणि दर्शन रांगेत तुफानी गर्दी असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे एकाच महिन्यात दोनदा आषाढी आल्याचं म्हटलं जात आहे. तर मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना नाश्ता आणि चहाचे वाटप करण्यात येत आहे. हा पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी असते. अशावेळी जास्तीत जास्त भाविकांना दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी भाविकांतून होत होती. आता मंदिराने रोजच्या 30 पूजा रद्द केल्याने भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor