पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरचे रुप पालटणार आहे. विठ्ठल मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे रूप मिळणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६१ कोटी ५० लाख रुपयांचा आराखडा प्राप्त झाला आहे. मंदिर समितीने नुकतीच या आराखड्यास मंजुरी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे मंदिराचे रुपडे पालटणार आहे.