Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Warning of 4 days
, गुरूवार, 29 जुलै 2021 (22:53 IST)
महापुरातून पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह कोकण सावरत असतानाच  पुन्हा एकदा हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांत 29 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे,  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांमधील अनेक ठिकाणी अजूनही पाणी ओसरलेलं नसल्यामुळे टेन्शन वाढलं आहे. 
 
दरम्यान,  चिंचवडच्या विविध भागात आज पावसानं दमदार हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होतं. पण संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमाराला विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. गेले काही दिवस पिंपरी चिंचवड शहरात पाऊस सुरूय. पण त्याचा जोर म्हणावा तसा नव्हता.  मात्र संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी समाधानी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' संदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार