Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Water in Petrol : पेट्रोल मध्ये पाणी टाकून धुळ्यात पेट्रोलची विक्री

Water in Petrol : पेट्रोल मध्ये पाणी टाकून धुळ्यात पेट्रोलची विक्री
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (16:32 IST)
Water in Petrol : धुळे शहरात एका पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी पेट्रोल भरून काहीच अंतरावर गेल्यावर वाहन बंद पडण्याच्या तक्रारी समोर आल्यावर ग्राहकांनी आपापली वाहने गेरेज मध्ये दाखविल्यानन्तर पेट्रोल टॅन्कमध्ये पेट्रोल सोबत पाणी असल्याचं उघडकीस झाले. नंतर याची तक्रार पेट्रोल पंप च्या मॅनेजरला केल्यावरून  पेट्रोल पंप मॅनेजरने पेट्रोल कंपनीशी बोलून ग्राहकांना पेट्रोल बदलून दिले.  
 
वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासणी केली असता पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं. तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल बाटलीत घेतले आणि पाहणी केली तर काय पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याच आढळून आलं. 
 
यावेळी पेट्रोल भरलेल्या वाहनचालकाच्या तक्रारी आणि गर्दी पेट्रोल पंपावर वाढत गेली. यावेळी ग्राहकांच्या अनेक तक्रारी ऐकून घेतल्यानंतर शेवटी पेट्रोल विक्री थांबवण्यात आली. यानंतर पेट्रोलची तपासणी करण्यात आली परंतु त्यात पाणी आढळलेच नाही, मग इतक्या ग्राहकांच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये हे पाणी कुठून आले? हे आश्चर्यकारक आहे. या वेळी ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

पेट्रोल पंपाचे मॅनेजरनी पेट्रोल मध्ये पाणी नाही हे प्रात्यक्षिक करून दाखवले. आपल्या पेट्रोल टाकीच्या वातावरणामुळे झाकणाला तयार झालेले दवाबिंदूमुळे पेट्रोल टाकीमध्ये पाणी तयार झाले असेल असे सांगितल्यावर देखील नागरिकांचे समाधान झाले नाही.तर मॅनेजरने ग्राहकांना नव्याने पेट्रोल देऊन  ग्राहकांची समजूत घालवण्याचा प्रयत्न केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आशीष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष