सध्या राज्यात लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे. आम्ही CGPL कंपनीकडून अतिरिक्त वीज विकत घेत असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
“एकीकडं राज्यात विजेची मागणी वाढत असून, दुसरीकडे कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्यामुळं प्लांण्ट्स चालवणं ही जिकरीचं झालंय. त्यामुळं त्याचसुद्धा नियमन करावं लागतंय. शिवाय त्याच व्यवस्थापन करून व्यवस्थित प्लान्ट चालला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणं कोळशाचा उपलब्ध झाला तरी, रेल्वेच्या रॅक उपलब्ध होत नाही. त्यामुळं निर्मिती केंद्राना दररोज लागणारा कोसळा कमी पडत आहे”.
“पावसाळ्यात ही कोसळाचा साठा संग्रहीत करावा लागतो. मात्र तो साठासुद्धा संग्रहीत होत नाही. या सर्व कारणांमुळं जेव्हा उस्तांत वाढतो तेव्हा ट्रान्सफॉर्मर देखील बंद पडण्याची मोठी भीती असते. असे प्रकार अनेक ठिकाणी घडले देखील आहेत”, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं.