मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवार पासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यासह शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.राज्यात एकीकडे कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून राज्यात दुसरीकडे अवकाळी पावसाने पुन्हा डोके वर काढले आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यात तीव्र उन्हाळा जाणवतोय तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
ऐन उन्हाळ्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रात्रीच्या वेळेस जावू लागला. राज्यात रात्रीच्या वेळी उकाड्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.मागील काही आठवड्यात राज्य़ातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्य़ानंतर हळूहळू तापमानाचा पार वाढत होता.मात्र तेवढ्यात वातावरणात पुन्हा बदल होत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटासह मुसळदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.