Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

What did Uddhav Thackeray say about naming Aurangabad airport after Sambhaji Maharaj? औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?Marathi  Regional News In Webdunia Marathi
, बुधवार, 26 जानेवारी 2022 (11:13 IST)
औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.
संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर असाच केला. औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
 
केंद्र लवकरच प्रस्ताव मंजूर करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. संभाजीनगर नामकरणाचा प्रश्न कायम असला तरी विमानतळाला संभाजी नगर नाव लवकरच दिलं जाईल आणि त्यामुळे लवकरच त्याचं बारसं करता येईल असंही ते म्हणाले.
 
संत एकनाथ महाराज नाट्यगृह मला तिथे येऊन पाहायचं आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. तसंच या नुतणीकरणासाठी हातभार लागलेल्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रजासत्ताक दिन परेड: राजपथ 12 राज्ये आणि 9 मंत्रालयांच्या चित्रांनी सज्ज