Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

काय म्हणता, नाशिकमधील भाजप आमदाराला धमकी

Devayani
, शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (09:00 IST)
नाशिक : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना मंत्री एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता त्यांच्या पाठोपाठ नाशिकमधील भाजपच्या आमदाराला देखील धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
एकनाथ खडसेंना धमकीचे प्रकरण ताजे असतानाच नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदेंना धमकी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या प्रकारानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून फरांदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात येऊन त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. 
 
नेमकं काय आहे प्रकरण? 
नाशिकच्या उपनगर परिसरात 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता. याच विरोधात आमदार देवयानी फरांदेंनी आवाज उठवला होता. पोलिसांकडून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरातीलच एका 21 वर्षीय युवकाला अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस सध्या करत असून या प्रकरणाच्या खोलवर जाऊन खऱ्या सुत्रधारांना अटक करावी, अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे. 
 
काय म्हणाल्या होत्या देवयानी फरांदे? 
उपनगर येथे घडलेल्या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी म्हटले होते की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. हा पूर्वनियोजित कट होता का? अचानक असे लोक रस्त्यावर कसे आलेत. हिंदू धर्मात भीती निर्माण करणारे काम का करण्यात आले? 
 
याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. सर तनसे जुदा करेंगे, आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज  बघितले का? नाशिक पोलिसांनी यावर काय कारवाई केली? असा सवाल देवयानी फरांदे यांनी पोलिसांना केला होता. तसेच देवयानी फरांदे यांच्याकडून नाशिक पोलिसांना 48 तासांचा अल्टीमेटम देखील देण्यात आला होता. 

Edited By - Ratnadeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात, २ ठार तर ३ गंभीर जखमी